सफाई कर्मचाऱ्यांना सापडलेल्या गोणीत आढळली बिबट्याची कातडी

नाशिकमधील वर्दळीच्या भागातील घटनेने खळबळ
सफाई कर्मचाऱ्यांना सापडलेल्या गोणीत आढळली बिबट्याची कातडी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरातील इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ (Indiranagar Jogging track) एका गोणीत बिबट्याची कातडी (leopard skin) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे....

शहराच्या वर्दळीच्या भागात ही घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी सफाई करत असताना त्यांना सकाळी एक प्लास्टिकची गोणी आढळून आली. या कर्मचाऱ्यांनी ही गोणी उघडून बघितली असता त्यांना त्यात बिबट्याची कातडी त्यात दिसली.

घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांना याबाबतची माहिती दिली. यानंतर तत्काळ इंदिरा नगर पोलीस ठाणे आणि वनविभागाला याबाबतची माहिती देण्यात आली.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीसांकडे ही गोणी जमा करण्यात आली. यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कातडी ताब्यात घेतली आहे.

या गोणीत बिबट्याची कातडी असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. पुढील तपासणीसाठी ही कातडी हैद्राबाद येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com