नाशकात भरदिवसा बिबट्याचे दर्शन

नाशकात भरदिवसा बिबट्याचे दर्शन
संग्रहित

नाशिक रोड | प्रतिनिधी Nashik Road

सामनगाव (Samangaon) रोड परिसरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बिबट्याने (Leopard) दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून परिसरात वनविभागाने (forest department) तातडीने पिंजरा बसवावा अशी मागणी शेतकरी (Farmers) वर्गातून केली जात आहे.

गेल्या काही दिवसापासून नाशिक रोडच्या (Nashik Road) पूर्व भागात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर सुरू आहे काल सायंकाळी अश्विनी कॉलनी परिसरात असलेल्या झाडाझुडपातून बिबट्याने भर रस्त्यावर दर्शन दिले.

याच दरम्यान या रस्त्यावरून गोकुळ अस्वले हे जात होते क्षणभर ते थांबले व त्यांनी या बिबट्याचा व्हिडिओ काढला दरम्यान हा बिबट्या झाडाझुडपातून परिसरात असलेल्या इरिण कडे असलेल्या जंगल परिसरात फरार झाला.

गेल्या काही दिवसांपासून या भागात सातत्याने बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत असून या बिबट्याने आतापर्यंत कुत्रे बकरे व इतर जनावरे फस्त केली आहे सदरच्या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने नागरिक सायंकाळी पाच वाजेनंतर बाहेरही निघण्यास घाबरतात.

वनविभागाने सदरच्या भागात तातडीने पिंजरा बसवावा अशी मागणी नगरसेवक पंडित आवारे संतोष साळवे तसेच सुदाम बोराडे योगेश भोर केशव बोराडे सुनील बोराडे नाना शिरसाट संजय काळे राहुल घोरपडे शांताराम बोराडे नाना शिंदे चंद्रभान ताजनपुरे आदींनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com