चुंचाळे भागात बिबट्याचे दर्शन

वन विभागाने लावला पिंजरा
चुंचाळे भागात बिबट्याचे दर्शन

नवीन नाशिक । Nashik

विल्होळी (Vilholi Village) नंतर दोन दिवसात चुंचाळे (Chunchale Area) भागात बिबट्याने (Leopard Caught) मेदगे यांच्या मळ्यात कुत्र्यावर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. बिबटयाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने (Forest Department) परिसरात पिंजरा लावला आहे.

जंगलातुन भक्षाच्या शोधात बिबटे शहरी भागात प्रवेश करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दिवसापुर्वी विल्होळी गावा लगत खाण परिसरात मादी बिबट्या व दोन बछड्याचे दर्शन (Leopard sightings) ग्रामस्थांना झाले होते. वन विभागाने त्या भागात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. या नंतर दोन दिवसात चुंचाळे भागात नागरिकांना बिबट्या दिसला.

चुंचाळे येथील रहिवासी शैला मेदगे (Shaila Medge) यांच्या मळ्यात रात्री ८ वाजेच्या सुमारास बिबट्याने कुत्र्यांच्या लहान पिल्ल्यावर हल्ला केला. ही घटना प्रत्यक्ष मेदगे यांनी पाहिली होती. बिबट्या आल्याने मळे वाले तसेच नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आमदार सीमा हिरे (MLA Seema Hirey) व नगरसेविका अलका आहिरे यांनी मेदगे मळ्याला भेट दिली. बिबट्या असल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. या नंतर वनविभागाचे अधिकारी विवेक भदाणे (Forest Officer Vivek Bhadane) यांनी घटनास्थली भेट देऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे.

चुंचाळे येथील शैला मेदगे यांच्या मळ्यात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. बिबट्याच्या दर्शनामुळे मळे परिसर व ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

-सुनिल मेदगे, ग्रामस्थ

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com