सातपूरला सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याचा बछडा जेरबंद

अजूनही परिसरात मादीचा वावर
सातपूरला सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याचा बछडा जेरबंद

सातपूर । Satpur

माजी सभापती सुरेखा गोकुळ नागरे यांच्या मळ्यात व पिंपळगाव बहुला शिवारातील शेत परिसरात गेल्या दहा दिवसांपासून नर मादी व दोन बछडे असा बिबट्यांचा संचार नागरिकांनी पाहिला आहे.

याबाबत वेळोवेळी वन विभागाकडे तक्रारही केली आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर वनविभागाने गोकुळ नागरे यांच्या मळ्यामध्ये पिंजरा लावला होता. दि. १६ एप्रिलला या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर नागरिकांच्या मागणीवर पुन्हा पिंजरा लावण्यात आला होता.

बिबट्याला फसवण्यासाठी त्यात कोंबडा ठेवण्यात आला होता. पहाटेे कोंबड्याने बांग दिल्यानंतर बिबट्याच्या बछड्याने कोंबड्यावर चाल केली आणि पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला.

या दोन बछड्यांच्या शोधात अजूनही परिसरात बिबट्यांचेे नर व मादी फिरत आहेत. ते आक्रमक झाले असल्याची भीती परिसरातील शेतकरी बांधव व्यक्त करीत आहेत. या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेनेचे पदाधिकारी गोकुळ नागरे यांनी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com