सिन्नर तालुक्यात बिबट्या जेरबंद

सिन्नर तालुक्यात बिबट्या जेरबंद

पाथरे | वार्ताहर | Pathare

मिरगाव शिवारातील लक्ष्मण काशिनाथ नरोडे (गट नंबर 342) यांच्या उसाच्या शेताजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. गेल्या वीस दिवसांपासून बिबट्याने या परिसरात आपला तळ ठोकला होता...

रात्री अपरात्री हा बिबट्या परिसरातील शेतकऱ्यांना आढळून येत होता तर त्याची डरकाळीही वारंवार ऐकू येत होती. बिबट्याच्या दहशतीमुळे दिवसादेखील शेतकरी एकटे शेतात जात नव्हते.

बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली. त्यानुसार पंधरा दिवसांपूर्वीच वनक्षेत्रपाल मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात पिंजरा लावण्यात आला.

परिसरातील हिंगे वस्ती व नरोडे वस्तीवरील लहान वासरे व कुत्र्यांना बिबट्याने लक्ष केले होते. सातत्याने बिबट्या आपली जागा बदलत होता. त्यामुळे तो सहजासहजी पिंजऱ्यात अडकत नव्हता.

चार दिवसांपूर्वीच पिंजऱ्याची जागा बदलून नरोडे यांच्या उसाच्या क्षेत्राजवळ ठेवण्यात आला. पिंजरातील कोंबड्यांकडे आकर्षित होऊन आज सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकला.

बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. वनक्षेत्रपाल मनीषा जाधव, वनपाल अनिल साळवे, वनरक्षक चिंतामणी तांबे, वनसेवक नारायण वैद्य यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याची रवानगी सिन्नरकडे केली. बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय सहा ते सात वर्ष असल्याचा अंदाज वनक्षेत्रपाल मनीषा जाधव यांनी देशदूतशी बोलताना व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com