अखेर दीड तासांनंतर बिबट्याला पकडण्यात यश

तरीही नाशिककरांनी गर्दी केलीच !
अखेर दीड तासांनंतर बिबट्याला पकडण्यात यश

नाशिक | Nashik

दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर गंगापूररोड परिसरातील तेजोप्रभा कॉलनीत आढळलेल्या बिबट्यास रेस्क्यू करण्यास वनविभागाला यश आले आहे.

https://www.deshdoot.com/local-news/nasik/leopard-found-at-gangapur-road

दरम्यान सकाळच्या सुमारास गंगापूर रोड परिसरात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर लागलीच वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. या दरम्यान बिबटयास दार्ट मारुन बेशुद्ध करण्यात आले होते. परंतु नागरिकांच्या गर्दीमुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडचणी येत होत्या.

अखेर दीड तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या ला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

याच दरम्यान RFO भदाणे यांच्या पायाला जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. रेस्क्यू दरम्यान नागरिकांनी गर्दी करू नये, वनविभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करूनही यावेळीही नाशिक करांची गर्दी दिसून आली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com