बिबट्या
बिबट्या
नाशिक

निफाड : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

नागापूर फाट्याजवळ घडली घटना

Gokul Pawar

Gokul Pawar

निफाड | Niphad

चांदोरी येथील नागापूर फाट्याजवळ नाशिक-औरंगाबाद महामार्गावर शिंदे वस्तीवर अज्ञात वाहनाच्या धडकेत 4 वर्ष वयाच्या बिबट्याची मादी ठार झाली आहे. मृत मादीला निफाडच्या रोपवाटिकेत पूर्णता जाळून टाकण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी म्हटले आहे.

गोदाकाठच्या चांदोरी, चितेगाव सह परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने या परिसरात बिबट्याचा वावर नित्याचा बनला आहे. मंगळवार दि.14 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील नागापूर फाटा येथे शिंदे वस्तीजवळ बिबट्या रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्याची 4 वर्ष वयाची मादी ठार झाली आहे.

परिसरातील नागरिकांनी सदरची बाब वनविभागाला कळविताच वनविभागाचे अधिकारी, सेवक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत मादीस शासकीय गाडीतून निफाडच्या रोपवाटिकेत आणले. तर काल बुधवार दि.15 रोजी सकाळी 10.30 वाजता पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रवींद्र चांदोरे यांनी मृत मादीचे शवविच्छेदन करुन सहाय्यक वनसंरक्षक सुजित नेवसे यांचे उपस्थितीत सदर मृत बिबट्याच्या मादीस निफाडच्या रोपवाटिकेत पूर्णता जाळून टाकण्यात आले.

याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल जी.बी. वाघ, वनरक्षक विजय टेकनर, वनमजूर भैय्या शेख, आर.एल. बोरकडे, वनसेवक उपस्थित होते. यावेळी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सुजित नेवसे यांचे मार्गदर्शन लाभले.

Deshdoot
www.deshdoot.com