इगतपुरी
इगतपुरी
नाशिक

इगतपुरी : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

रायांबे - क-होळे मार्गावरील घटना

Gokul Pawar

Gokul Pawar

घोटी । Ghoti

इगतपुरी तालुक्यात काल रात्री उशिरा क-होळे - रायांबे मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या ठार झाला. आज सकाळी ही बाब निदर्शनास येताच वनविभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा झाला.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार काल शुक्रवार रोजी रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात असलेला एक वर्ष वयाचा बिबट्या क-होळे - रायांबे शिवारात संचार करीत असतांना याच मार्गावरून धावणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेची आज सकाळी माहिती समजताच या मंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तू ढोन्नर यांना समजताच त्यांनी वनरक्षक आर बी घाटेसाव यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

मिळालेल्या माहितीनुसार हा मरण पावलेला बिबट्या हा नर जातीचा असून अंदाजे एक ते दीड वर्षांचा आहे. आज वैतरणा शिवारात या मृत बिबट्यावर शवविच्छेदन करण्यात येऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com