Video : त्र्यंबकेश्वरला बिबट्या जेरबंद
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
येथील वारूणसे मळ्यात (Warunse Mala) लावलेल्या पिंजऱ्यात (Cage) आज पहाटेच्या सुमारास बिबट्या (Leopard) जेरबंद झाला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, दहा ते पंधरा दिवसांपूर्वी वारूणसे मळ्यातील काही कुत्र्यांवर (Dogs) या बिबट्याने हल्ला केला होता. त्यावेळी लोकांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने जवळच असणाऱ्या उसात धूम ठोकली होती. यानंतर याठिकाणच्या रहिवाशांनी वनविभागाकडे (Forest Department) पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावला होता.
यानंतर आज पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद (Jalied) झाला. यावेळी बिबट्या जेरबंद होताच स्थानिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी (Crowd) केली होती. तर बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पिंजरा ताब्यात घेतला. वनविभागाच्या या कामगिरीबद्दल येथील आजुबाजूचे रहिवासी वारूणसे, कडलग यांनी समाधान व्यक्त केले आहे.