अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway)वाडीवऱ्हे (Wadivarhe)जवळील व्हिटीसी फाट्याच्या मागे शुक्रवारी ( दि.१८) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एका बिबट्याला (Leopard)अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली...

याबाबत अधिक माहिती अशी की, या धडकेत बिबट्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला हालचाल करता येत नव्हती. यावेळी महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला (Forest Department) दिली. तसेच जखमी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, त्यानंतर इगतपुरीचे प्रादेशिक वनपरीक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस (Forest Range Officer Ketan Biraris) यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी शैलेश झुटे (Shailesh Jute) यांनी जखमी बिबट्याला तातडीने ताब्यात घेत पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करून जीव वाचवला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com