गोराणे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

गोराणे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

अंबासन । प्रतिनिधी Ambasan

बागलाण तालुक्यातील Baglan Taluka गोराणे Gorane येथे गत अनेक दिवसांपासून बिबट्याने Leopard उच्छाद मांडत दहशत निर्माण केली आहे. पाळीव प्राण्यांवर हल्ला करून बिबट्या फस्त करत आहे. मात्र वनविभागाकडून Department of forest भरपाई मिळत नसल्याचा आरोप स्थानिक शेतकर्‍यांनी केला आहे. पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकर्‍यांतर्फे केली जात आहे.

गोराणे शिवारातील वाघदेव पाटी येथील शेतकरी मोठाभाऊ दगा देसले यांच्या बंदिस्त कांदा चाळीत शेळ्या बांधलेल्या होत्या. आज पहाटेच्या सुमारास बिबट्याने कांदा चाळीची लोखंडी जाळी उचकटून आत प्रवेश करत चारही शेळ्यांवर हल्ला चढवून फस्त केल्या. पहाटे देसले शेतात पाहणी करत असताना सदर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सामाजिक कार्यकर्ते विलास देसले यांनी सटाणा वनविभागात माहिती दिली.

या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याने पोल्ट्री फार्मवरील कोंबड्या तसेच शेतकर्‍यांचे पाळीव जनावर फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त होत नसल्याचा आरोप शेतकर्‍यांतर्फे केला गेला. दरम्यान, या परिसरात शेतकर्‍यांचे झालेल्या नुकसान याबाबत वनविभागाकडून भरपाईसद्धा मिळत नसल्याचे पशुपालकांनी सांगितले.

परिसरात सध्या बाजरी व मक्याची पिके मोठी झाली असल्याने शेतकर्‍यांवर बिबट्याकडून हल्ला होण्याच्या शक्यता नाकारता येत नसल्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावून शेतकरी व जनावरांची बिबट्यापासून सुटका करावी, अशी मागणी सरपंच कृष्णाताई देसले यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com