बिबट्याचा थेट स्वयंपाकघरात

बिबट्याचा थेट स्वयंपाकघरात

ओझे । विलास ढाकणे

दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) दिवसेंदिवस बिबट्याच्या (Leopard) संख्येत वाढ होऊन या बिबट्यानी ऊसाच्या शेतामध्ये (Sugarcane farming) आश्रय घेतल्यामुळे ऊसाचे शेत त्यांचे माहेर घर बनले आहे. त्यामुळे ऊसाच्या शेतात काम करणे व पाणी देणे मोठे अवघड होऊन बसले आहे.

दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातील कादवा नदी (kadva river) परिसरासह ओझे (ozhe), करंजवण (Karanjavan), म्हेळुस्के (Mheluske), बिबट्याने दहशत निर्माण केल्यामुळे शेतकरी (farmers) वर्गासह मजूरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने (Forest Department) तक्रार केलेल्या गावामध्ये पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.

कादवा नदी परिसरामध्ये बिबट्याला लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र असल्यामुळे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ऊसाच्या शेतात बिबटे आपल्या छोट्या पिल्लासह वास्तव्य करीत आहे. त्याप्रमाणे हा परिसर कादवा नदीचा असल्यामुळे बिबट्याना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. हे बिबटे दिवस रात्र कादवा नदी परिसरात भंटकती करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

दिवसा सुध्दा ऊसाला पाणी देण्याची शेतकर्‍यांची हिंमत होत नाही. कादवा नदी परिसरातील ओझे, करंजवण, म्हेळुस्के, लखमापूर, कादवा म्हाळूंगी गावाचा परिसर हा बिबट्याचे सध्या माहेर घर होत आहे. सध्या हे बिबटे एवढे बिनधास्त झाले आहे कि, मळ्यात वस्तीवर असणार्‍या कुत्रे, मांजरे, वासरे या पाळीव प्राण्यांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करीत असल्यामुळे या परिसरामधील पाळीव प्राण्यांची संख्य झपाट्याने घटताना दिसत आहे. चार ते पाच दिवसापुर्वी ओझे येथील शेतकरी शिवाजी हरी शिंदे यांच्या ऊसाच्या शेतात बिबट्याने धुमाकुळ घातला असून या परिसरामधील लोकांमध्ये सध्या भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्याप्रमाणे ओझे येथील दुसरे शेतकरी संपत गोजरे यांच्या मळ्यातील घरामध्ये सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास थेट स्वयंपाक घरामध्ये बिबट्याने प्रवेश केला मात्र घरातील सर्व लोक घरांच्या बाहेर असल्यामुळे मोठा अनार्थ टळला आहे. करंजवण येथील बापू मोरे हे रात्री लाईट आल्यानंतर मळ्यात उसाला पाणी देण्यासाठी गेले असता सलग दोन दिवस बिबट्याने (Leopard) त्यांना दर्शन देवून दहशत निर्माण केली. त्यामुळे या संपूर्ण कादवा नदी (kadva river) परिसरातील गावातील मळ्या मध्ये राहणार्‍या लोकांमध्ये बिबटयाने दहशत निर्माण केली आहे. सध्या विजेचा तुटवडा असल्यामुळे महावितरण कंपनीकडून (MSEDCL) रात्रीचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे मळ्यामध्ये राहणार्‍या कुटूबांना या भारनियमनाचा फटका बसत आहे.

बिबटे अंधाराचा फायदा घेवून वाडी वस्त्यावर बिनधास्त प्रवेश करित असल्यामुळे या लोकांमध्ये दहशत पसरली आहे. विशेषत: बिबटे सांयकाळी व पहाटेच्या वेळ जास्त बाहेर फिरतता त्याच वेळस नेमके महावितरणकडून सिंग्ल फेजला सुध्दा भारनियमन केले जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. या परिसरातील रात्रीचे होणार भारनियमन बंद करण्याची मागणीही सध्या या परिसरातून पुढे येत आहे. त्याप्रमाणे वनविभागाने या परिसरामध्ये जाऊन लोकांमध्ये बिबट्या विषयी जनजागृती करून बिबट्या कायम स्वरूपी वास्तव्यास असणार्‍या ठिकाणी पिंजरे लावून जनतेला सहकार्य करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकाकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.