शहा शिवारात बिबट्याचा धुमाकूळ

शहा शिवारात बिबट्याचा धुमाकूळ

वावी | वार्ताहर Vavi-Sinnar

सिन्नर तालुक्याच्या (Sinnar Taluka) पूर्व भागात असणाऱ्या शहा शिवारात गेल्या दोन ते चार दिवसापासून बिबट्याने (Leopards) धुमाकूळ घातला असून रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना (Farmers) बाहेर पडणे मुश्कील झाले आहे भयभीत झालेले शेतकरी संध्याकाळच्या वेळेस आपली जनावरे गाय-बैल शेळ्या बकऱ्या व कुत्र्यांची रक्षण करण्याची मोठी डोकेदुखी खरंच आहे.

शहा शिवारातील संजय शिंदे पोस्टमास्तर यांच्या वस्तीजवळ बिबट्याने सोमवार दि.13 रोजी रात्री च्या वेळेस पावसाचे वातावरण (Rainy weather) असल्याने काळोखे रात्रीचा फायदा घेत कुत्र्याचा पाठलाग करता करता बाळासाहेब संपत काळे यांच्या वस्तीवरील दोन वर्षाच्या वासराचा फडशा पाडला काळे यांच्या लक्षात येऊ पर्यंत कुत्र्याला घेऊन बिबट्या पसार झाला व त्याच रात्री शिंदे यांच्या वस्ती वरून दुसऱ्या कुठल्या कुत्र्याचा पाठलाग करत असताना

कुत्र्याने धूम ठोकली व सुभाष आदिक यांच्या ऊसात कुत्रा घुसल्याने बिबट्याला तिसरी संधी मात्र हुकली मात्र बिबट्याच्या डरकाळी व कर्कश आवाजाने शेतकरी मात्र धास्तावले आहे बिबट्या तेथेच दबा धरून असल्याचे स्थानिक शेतकरी सांगतात सिन्नर विभागीय वनखात्याने त्वरित पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com