ओणे, सुकेणे शिवारात बिबट्याचा मुक्त संचार

ओणे, सुकेणे शिवारात बिबट्याचा मुक्त संचार

कसबे सुकेणे। वार्ताहर

कसबे सुकेणे व ओणे शिवारात बिबट्याच्या मुक्त संचाराने ग्रामस्थ भयभीत झाले असतानाच प्रवीण भाऊसाहेब जाधव यांच्या पाळीव कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. बिबट्या जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

सुकेणे परिसरात सध्या खरीप हंगामासह द्राक्षबागांची कामे सुरू असून पिकांना पाणी देण्यासाठी शेतकर्‍यांना रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडावे लागते. माशत्र आता परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू झाल्याने रात्री घराबाहेर पडण्याचे शेतकरी टाळू लागले आहेत. येथील प्रवीण भाऊसाहेब जाधव यांच्या वस्तीवरील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवत त्यास ठार केले.

बिबट्या जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे. यापूर्वी देखील भाऊसाहेबनगर, पिंपळस रामाचे, चांदोरी शिवारात बिबट्याने अनेकांना दर्शन देत कुत्रे, कोल्हे, शेळ्या, मेंढ्या, वासरे यांचा फडशा पाडला आहे.

या परिसरात गेल्या काही वर्षापासून बिबट्याचे सातत्याने वास्तव्य आढळून आले आहे. अनेकवेळा बिबटे जेरबंद करूनही पुन्हा याच परिसरात बिबट्यांचे दर्शन होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com