कळवण-पाळे खुर्द शिवारात बिबट्याची दहशत

कळवण-पाळे खुर्द शिवारात बिबट्याची दहशत

शेतकर्‍याच्या घरासमोरच दर्शन

कळवण । प्रतिनिधी Kalwan

कळवण तालुक्यातील ( Kalwan Taluka ) पाळे खुर्द शिवारात( Pale Khurd Shivar ) बिबट्याचे ( Leopard )दिवस दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घाबरहाटीचे वातावरण आहे. आज सकाळी पाळे खुर्द येथील सुनिल दादासाहेब पाटील यांच्या घरासमोर बिबट्याचा वावर त्यांनी त्यांच्या भ्रमणध्वनी मध्ये व्हिडीओ काढला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या तक्रारीत तथ्य असल्याने वनविभाग खडबडून जागे झाले आहे.

गेल्या एक वर्षांपासून पाळे खुर्द ता कळवण येथील सांडोस या नदीच्या शिवारात दोन बिबट्यांचा वावर असल्याच्या तक्रारी शेतकरी बांधवानी वारंवार वनविभागाकडे केल्या होत्या. मात्र वनविभाग त्याकडे सर्रास दुर्लक्ष करीत होते. मात्र आज आषाडी एकादशीच्या दिवशी सकाळी सुनिल दादासाहेब पाटील यांच्या घरासमोर बिबट्याचा मुक्त संचार सुरु होता. सकाळी रिमझिम पाऊस झाल्याने घरातील सर्वच सदस्य घरात होते म्हणून मोठा अनर्थ टळला आहे.

यंदा पावसाने दडी मारल्याने ( Lack of Rain ) पेरण्यांना उशीर झाला आहे. असे असतांना बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी व शेत मजूर शेतात जाणार्‍याच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी वनविभागाकडे केली आहे.

सुचिता पाटील, वनरक्षक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. शेतकरी सुनील पाटील यांच्या गिरणानदीकाठच्या उसाच्या शिवारात वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत पाटील व वनपाल वाय एस निकम यांच्या मार्गदर्शनानुसार या भागात तात्काळ पिंजरा लावला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com