
निफाड | प्रतिनिधी
तालुक्यातील उत्तर पूर्व पट्ट्यातील रासाका परिसरात (Rasaka Area) बिबट्याच्या मुक्तसंचाराने (Free Movement) ग्रामस्थ भयभित झाले असून या बिबट्याने (Leopard) परिसरातील अनेक शेळ्या, मेंढ्या, कुत्रे यांचा फडशा पाडला आहे....
याबाबत अधिक माहिती अशी की, रानवडसह (Ranwad) रासाका परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने दहशत बसविली आहे. सध्या रासाकाचा गाळप हंगाम (Season of Harvest) सुरु असल्याने ऊस तोडणी (Sugarcane Cutting) मजुरांचे मोठया प्रमाणात आगमन झाले आहे. तसेच कामगार, व्यवसायिक मोठ्या प्रमाणात असून द्राक्ष बागेसह कांदा लागवड व शेती मशागतीची कामे मोठया प्रमाणात सुरू आहे.
त्यातच वीज वितरण कंपनीच्या (Electricity Distribution Company) भारनियमनामुळे रात्री जर लाईट असली तर पिकांना पाणी देण्यासाठी मळ्यात जावे लागते. परंतु बिबट्याच्या या दहशतीमुळे शेतकरी (Farmer) हतबल झाला असून शाळेचे विद्यार्थी आणि रासाका कामगार बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे. बिबट्याने दररोज गाई, वासरे, पाळीव कुत्रे यांच्यावर हल्ला करून त्यांना आपले भक्ष बनवण्याचे काम सुरू केले आहे.
तसेच दोन दिवसापूर्वी रासाका कालव्यालगत राहणारे भाऊसाहेब गांगुर्डे यांच्या वस्तीवरील दोन कुत्र्यांचा आणि बाहेरील जिल्ह्यातून मेंढ्या घेऊन आलेल्या मेंढपाळांच्या दोन मेंढ्यांचा बिबट्याने फडशा पाडला असून अनेक शेतकऱ्यांना बिबट्याने दर्शन दिले आहे. परंतु, या गंभीर बाबीकडे वनविभाग दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
दरम्यान, वनविभागाने (Forest Department) लवकरात लवकर या परिसरात पिंजरा (Cage) लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.