Video : कळवण : पाळे खुर्द येथे बिबट्याचा भरदिवसा मुक्तसंचार

घटना कॅमेऱ्यात कैद
Video : कळवण : पाळे खुर्द येथे बिबट्याचा भरदिवसा मुक्तसंचार

पुनदखोरे | Punadkhore

कळवण तालुक्यातील (Kalwan Taluka) पाळे खुर्द परिसरातील सांडोस शिवारात बिबट्याचा (Leopard Sightings) भरदिवसा मुक्त संचार असल्याने  शेतकऱ्यांसह मजूर वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाकडे पिंजरा (Leopard Cages) लावण्याची ग्रामस्थांची मागणी केली आहे.

पाळे खुर्द येथील सांडोस शिवारात बिबट्याचा सुमारे एक वर्षांपासून वावर सुरू असल्याने, भक्षाच्या शोधात बिबट्या आता भरदिवसा शेतांमध्ये वावरू लागला असल्याचे चित्र कॅमेरात कैद झाले आहे.

या घटनेची माहिती वनविभागाला दिली असता अधिकारी पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन बिबट्याचा वावर ज्या ठिकाणी आहे, त्या ठीकाणी पिंजरा लावण्या संदर्भात कर्मचाऱ्यांना सांगीतले.

याबाबत शेतकऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत या बिबट्याला सुमारे एक वर्षापासून छोटे मोठे भक्षक मिळत असुन कुत्र मांजरांची शिकार करून भुक भागवत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com