गंगापूर रोड परिसरात बिबट्याचे दर्शन

गंगापूर रोड परिसरात बिबट्याचे दर्शन

रेस्क्यू टीम घटनास्थळी

नाशिक | Nashik

गंगापूररोड परिसरातील भरवस्तीत रविवारी (दि.१८) सकाळी बिबट्याचे दर्शन झाले आहे. तीन तासांच्या रेस्क्यू ऑप्रेरशननंतर बिबट्या पकडण्यात वनविभागास यश आले आहे.

एसटी कॉलनीलगत असलेल्या एका गोडाऊनच्या भिंतीवरून उडी मारून बिबट्या बाहेर आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

बिबट्या आल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाची दोन पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. या पथकाकडून गेल्या दोन तासांपासून भेदरलेल्या बिबट्याचा शोध घेतला जात आहे.

बिबट्या परिसरातील एका रो-हाऊसमध्ये दडून बसला असून, वनविभाग व इको- फाउंडेशनचे स्वयंसेवक त्याच्या मागावर आहेत.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू पथकाने तयारी पुर्ण केली आहे. प्रसंगी इंजेक्शनद्वारे बिबट्याला बेशुद्ध केले जाणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com