Nashik News : भक्ष्याच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत; सिन्नर तालुक्यातील 'या' ठिकाणची घटना

Nashik News : भक्ष्याच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत; सिन्नर तालुक्यातील 'या' ठिकाणची घटना

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यातील कासारवाडी (Kasarwadi) येथील गणेश खिंड रोड भागातील (Ganesh Khind Road Area) पडक्या विहिरीत (Abandoned Well) भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या (Leopard) पडल्याची घटना बुधवारी (दि.२०) रोजी रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने विहिरीला पाणी नसल्याने बिबट्याने कपारीचा आधार घेत संपूर्ण रात्र विहिरीत काढली. त्यानंतर आज (दि.२१) रोजी दुपारी वनविभागाने रेस्क्यू करत बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढत जेरबंद केले...

Nashik News : भक्ष्याच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत; सिन्नर तालुक्यातील 'या' ठिकाणची घटना
Nashik News : कांदा व्यापाऱ्यांच्या संपावर तोडगा नाहीच; पालकमंत्री भुसेंसोबतची बैठक निष्फळ

याबाबत अधिक माहिती अशी की, कासारवाडी शिवारातील गणेश खिंड रोडवर शेत गट नं. ११९ मध्ये भागवत सीताराम साळुंखे यांची शेतजमीन (Farm land) आहे. त्यात त्यांची जुनी पडकी विहिर असून विहिरीच्या भोवताली गवताचा वेढा पडलेला आहे. यंदा परिसरात पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने या विहिरीच्या केवळ तळालाच पाणी साचलेले आहे. परिसरात ऊस व मकाचे क्षेत्र अधिक असल्याने काही दिवसांपासून परिसरात बिबट्यांचे वास्तव्य बघायला मिळत असते. त्यामुळे रात्रीच्यावेळी शेतकऱ्यांना बाहेर पडणेही मुश्किल होते. असाच एक बिबट्या रात्रीच्यावेळी भक्ष्याच्या शोधात असताना विहिरीचा अंदाज न आल्याने तो थेट पाण्यात पडला.

Nashik News : भक्ष्याच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत; सिन्नर तालुक्यातील 'या' ठिकाणची घटना
Nashik Bribe News : चार हजारांची लाच घेतांना महिला अधिकाऱ्यास अटक

मात्र, विहिरीला जास्त पाणी नसल्याने बिबट्याला विहिरीच्या तळाशी असलेल्या एका कपारीचा आधार मिळाला व रात्रभर तो त्यावर बसून राहिला. सकाळी शेतकरी (Farmer) साळुंखे हे शेतावर गेले असता त्यांना विहिरीतून डरकाळ्यांचा आवाज येत असल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले. त्यांना बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून येताच त्यांनी उपसरपंच सचिन देशमुख यांना याबाबत फोनवर माहिती दिली. त्यानंतर सरपंच सुनिल सांगळे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी येत तात्काळ वनविभागाला (Forest Department) पाचारण केले. यावेळी वनपरिमंडळ अधिकारी ए. बी. साळवे, वनरक्षक ए. टी. रुपवते, सी. ए. तांबे, दिपाली सदावर्ते, माधवी जाधव, सेवक रोहित लोणारे, शंकर वारघडे यांनी घटनास्थळी येत पाहणी केली.

Nashik News : भक्ष्याच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत; सिन्नर तालुक्यातील 'या' ठिकाणची घटना
Nashik News : फरार भामटा खंडणी पथकाच्या हाती

दरम्यान, त्यांनतर विहिरीत पिंजरा (Cage) सोडून दोन तासांनंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद (Caught) करण्यात सेवकांना यश मिळाले. सदर मादी बिबट्या असून तिचे अंदाजे वय एक ते दिड वर्ष असल्याचे वनसेवकांकडून सांगण्यात आले. यानंतर बिबट्याला जेरबंद करुन त्यास सुरक्षितपणे नांदूरशिंगोटे (Nandoor Shingote) वन वसाहतीत नेण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Nashik News : भक्ष्याच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत; सिन्नर तालुक्यातील 'या' ठिकाणची घटना
Nashik News : पाण्यासाठी देवळा पूर्व भागातील नागरिक एकवटले
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com