...अन् जेव्हा बिबट्या शेडमध्ये घुसला

...अन् जेव्हा बिबट्या शेडमध्ये घुसला

सिन्नर | प्रतिनिधी | Sinner

तालुक्यातील पाडळी (Padali) येथे दोन बिबट्यांच्या (Leopard) झालेल्या भांडणात एकाने घायाळ झाल्यामुळे जनावरांसाठी बांधलेल्या शेडचा आसरा घेतला तर दुसऱ्याने तेथून धूम ठोकली...

याबाबत अधिक माहिती अशी की, पाडळी येथील बाळू मारुती पाटोळे (Balu Maruti Patole) यांच्या घराजवळील शिवारात आज दुपारी अकरा वाजेच्या सुमारास दोन बिबट्यांची झुंबड उडाली. त्यात एक बिबट्या चांगलाच घायाळ झाल्याने त्याने पाटोळे यांच्या शेडमध्ये जाऊन कोपऱ्यात आसरा घेतला. तर दुसरा तेथून पळून गेला.

त्याचवेळी पाटोळे यांचा मुलगा गोपीनाथ हा जनावरांना (Animal) पाणी (Water) पाजण्यासाठी आला असता त्याला बिबट्या शेडमध्ये घुसल्याचे दिसले. त्यावेळी त्याने लगेच ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. यानंतर तात्काळ वनविभागाला (Forest Department) पाचारण करण्यात आले असता त्यांनी शेडजवळ तीन पिंजरे (Cage) लावून दुपारी दोन वाजेच्या सुमारास बिबट्याला कैद केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com