बिबट्या
बिबट्या|Forest Range Area Sinnar
नाशिक

सिन्नर : सोनेवाडी येथे भुकेने बिबट्याचा मृत्यू

शेतात सापडला मृतावस्थेत

Vilas Patil

Vilas Patil

चापडगाव । सतिष आव्हाड

सिन्नर तालुक्यातील दापूरपासून जवळच असणाऱ्या सोनेवाडी येथे आज (दि.5) सकाळी 11 च्या दरम्यान गणीभाई शेख यांच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत सापडला. 10-11 वर्षाच्या या नर बिबट्याचा भूकेमूळे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शेख हे नेहमीप्रमाणे चास फाट्यावरील शेतात गेले असता त्यांना हा बिबट्या दिसून आला. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण पाटील, बचाव पथकाचे वनपाल अनिल साळवे, प्रितेश सरोदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व बिबट्याला सिन्नर-नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटातील वनोद्यानात आणले. तेथे तालुका पशु वैद्यकिय अधिकारी भणगे यांनी शवविच्छेदन केले.

हा बिबट्या 10-11 वर्षाचा असून त्याचा भूकेने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज भणगे यांनी व्यक्त केला. या बिबट्याला मुतखड्याचाही त्रास असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. शवविच्छेदनानंतर उद्यानातच बिबट्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com