अरेरे! उपचार करण्याऐवजी बघ्यांनी डिवचले, बिबट्याचा मृत्यू; नाशकातील घटनेने हळहळ

बिबट्या
बिबट्या

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरातील मुंगसरे फाटा येथे वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. उपचाराची गरज असतानाही बघ्यांनी तसेच वाहनचालकांनी बिबट्याला दगड तसेच आणि काठ्यांनी डिवचल्याने या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे...

घटनेची माहिती मिळताच तालुका पाेलिस व वनखात्याचे रेस्क्यू पथक दाखल झाले. बिबट्याला ताब्यात घेतले मात्र, उपचारापूर्वीच ताे गतप्राण झाला हाेता.

साेमवारी सायंकाळी मुंगसरा फाट्याजवळ एका पूर्णवाढ झालेल्या बिबट्याला भरधाव वाहनाने धडक दिल्याची घटना घडली होती. दुर्घटनेत बिबट्या जखमी हाेऊन अक्षरश: विव्हळत हाेता. त्याच्या पायांना व हाडांना जबर मार लागल्याने त्याला हालचाल करता येत नव्हती.

याचवेळी रस्त्याने ये-जा करणारे वाहनधारक व पादचारी थांबले. त्यांनी बिबट्याला रस्त्यावरुन बाजूला करण्यासाठी काठीने डिवचले.

चवताळलेला बिबट्या जीवाच्या आकांताने पळ काढण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र, दुखापतीमुळे त्याला चालता आले नाही. यानंतर चवथाळलेल्या बिबट्याने हालचाल सुरु केली. मात्र, दगडाचे मार लागल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वन्यजीव प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com