
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
तालुक्यातील वेळूंजे शिवारात (Welunje Shivar) दहा दिवसांपूर्वी एका बिबट्याने (Leopard) सहा वर्षीय बालकावर हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू (Death) झाला होता. त्यानंतर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील स्थानिकांनी वनविभागाकडे केली होती.
त्यानंतर वनविभागाने (Forest Department) या परिसरात पिंजरा (Cage) लावला असता दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर एका बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे. तसेच एकीकडे स्थानिकांकडून वनविभागाच्या या कामगिरीचे कौतुक होत असतांना दुसरीकडे बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, ज्या बिबट्याने सहा वर्षीय बालकावर हल्ला (Attack) केला होता, तो हाच बिबट्या आहे का? असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच यावेळी पिंजऱ्यातील बिबट्याला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी (Crowd) केली होती.