Video : तामसवाडीत बिबट्या जेरबंद

Video : तामसवाडीत बिबट्या जेरबंद

करंजी खुर्द | वार्ताहर karanji khurd

निफाड तालुक्यातील तामसवाडी येथे काही दिवसापासून ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. (Leopard caught in the cage in tamaswadi niphad)

गेल्या गेल्या काही दिवसापासून या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे कुत्रे, वासरे, कोंबड्या, तर दिनांक 15 रोजी भाऊसाहेब आरोटे व गणेश आरोटे संध्याकाळच्या वेळी आपल्या दुचाकीवरून जात असताना बिबट्याने हल्ला केला होता. (leopard attack on the man)

बिबट्याने भाऊसाहेब आरोटे यांची पॅन्ट ओढली होती. यावेळी आरोटे यांनी आरडा-ओरडा करुन कसाबसा आपला जीव वाचवला. त्यानंतर जवळच असलेल्या योगेश खाडे यांच्या वस्ती वरून बिबट्याने कुत्रे ओढुन नेले होते.

त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यामुळे गेल्या आठ दिवसापूर्वी तामसवाडी येथील गोपाळराव आरोटे यांच्या गट नंबर 410 /4/5 या गट नंबर मध्ये वन विभागाने पिंजरा लावला होता.

आठ दिवसानंतर काल (दि 21) रोजी पहाटे च्या सुमारास सावजाच्या शोधात असलेल्या बिबट्या अलगत पिंजऱ्यात अडकला. (Leopard caught in the cage at tamaswadi) सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वन विभागाला दिल्याने वनविभागाचे वनसेवक भैय्या शेख रोजंदारी कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी दाखल होऊन पिंजरा ताब्यात घेतला तर बिबट्या मादी जाती ची असून एक ते दीड वर्ष वयाचा असल्याचे सांगितले.

गेल्या काही महिन्यांपूर्वी याच भागातून नऊ ते दहा बिबटे पकडण्यात वन विभागाला यश आले असले तरी याच परिसरात अजूनही बिबट्याचा वावर असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

त्यामुळे येथील शेतकरी भयग्रस्त झाले असून या परिसरात पुन्हा पिजरा लावावा अशी मागणी तामसवाडी येथील शेतकरी भगवान आरोटे, दीपक आरोटे, पप्पू खाडे, गिरीश आरोटे, बाळू गीत, व आदी शेतकऱ्यांनी केली.

Related Stories

No stories found.