चांदगिरी गावात बिबट्या जेरबंद

चांदगिरी गावात बिबट्या जेरबंद

नाशिक | दारणा काठालगत चांदगिरी गावामध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटेला बिबटया जेरबंद झाला.

चांदगिरी गावानजीक काबरा फार्म हाऊस परिसरात पिंजरा लावण्लायात आला होता. पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती फार्म हाउसच्या व्यव्स्थापकाकडून वनविभागाला देण्यात आली.

यानंतर घटनास्थळी वन परिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी व त्यांचे पथक दाखल झाले. यानंतर पिंजरा ताब्यात घेतला असून नाशिक शहरातील रोपवाटिकेत बिबट्याला ठेवण्यात आले आहे.

पळसे, जाखोरी, सामनगाव, चिंचोली, चाडेगाव, देवळाली कॅम्प, आणि चांदगिरी याठिकाणी बिबट जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहेत.

AD
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com