टाकेद परिसरात बिबट्या जेरबंद

टाकेद परिसरात बिबट्या जेरबंद

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

तालुक्यातील टाकेद परीसरातील (Taked Area) राहुलनगर (RahulNagar) येथील दुर्गादेवी टेकडीजवळ (Durga Devi Hill) बिबट्याला (Leopard) जेरबंद करण्यात इगतपुरी वनविभागाला यश आले आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यामधील विविध गावांत नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यातच इगतपुरी (Igatpuri) येथील टाकेद परिसरातील राहुलनगर येथील नागरिकांना बिबट्या दिसला होता.

त्यामुळे याठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. या मागणीची दखल वनविभागाने (Forest Department) घेत त्याठिकाणी पिंजरा (cage) लावला असता बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, या मोहिमेत इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस (Ketan Biraris) वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव (Bhausaheb Rao) यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक स्वाती लोखंडे (Forest Guard Swati Lokhande) रेस्मा पाठक, गोरख बागुल, फैजअली सैय्यद, वनमजुर दशरथ निरगुडे, गोविंद बेंडकोळी, भोरु धोंगडे, धोंडीराम पेढेकर, पूनाजी कोरडे, अर्जुन मदगे यांनी सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com