शहा परिसरात बिबट्या जेरबंद

शहा परिसरात बिबट्या जेरबंद

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शहा परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दर्शन देणारा बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. (Leopard Caught in the Cage)

अधिक माहिती अशी की, पाथरे शिवारातील शिंदे वस्ती (Shinde Vasti) परिसरातील ग्रामस्थांना बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे निदर्शनास आले. यानंतर वनविभागाला कळवत बिबट्याला येथून नेण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार मध्यरात्री एकच्या सुमारास बिबट्याची डरकाळी ऐकू आली.

यानंतर येथील ग्रामस्थांनी ज्या ठिकाणी पिंजरा लावला होता तिथे जाऊन बघितले असता बिबट्या अडकल्याचे दिसले. यानंतर सिन्नर (Sinnar Forest Dept) येथील वन अधिकारी वर्गाला याबाबत माहिती दिली. सकाळी वनविभागाने बिबट्या ताब्यात घेतला.

या बिबट्याने गेल्या अनेक दिवसांपासून दहशत माजवली होती. तसेच परिसरातील अनेक शेतकऱ्यांची वासरे व कुत्रे फस्त केली होती. त्यामुळे याठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केल्यानंतर वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावला होता.

Related Stories

No stories found.