Video : वडगाव परिसरात धुमाकुळ घालणारा बिबट्या जेरबंद

Video : वडगाव परिसरात धुमाकुळ घालणारा बिबट्या जेरबंद

मालेगाव । प्रतिनिधी Nashik

गत दहा दिवसांपासून वडगाव परिसरात धुमाकुळ घालत पाळीव प्राण्यांचा फडशा पाडणार्‍या बिबट्यास पिंजर्‍यात जेरबंद करण्यास वनविभागाच्या पथकास अखेर यश आले. त्यामुळे धास्तावलेल्या शेतकर्‍यांसह ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. हिंस्त्र बनलेल्या या बिबट्याची संरक्षित वनक्षेत्रात रवानगी करण्यात आली आहे.... (Leopard Caught in the cage at wadgaon malegaon)

वडगावसह (Wadgaon) कोकणदरा (Kokandara) परिसरात गत आठ-दहा दिवसांपासून बिबट्या धुमाकुळ घालत शिवारातील पाळीव प्राण्यांवर हल्ले चढवत त्यांचा फडशा पाडत होता. गत दोन-तीन दिवसांपासून भरदिवसा बिबट्या शिवारात बिनधास्त वावरत असल्याचे वाल्मिक चव्हाण, किरण राजकोर, कोमल पाटील आदी शेतकर्‍यांनी पाहिले होते.

या बिबट्याने प्रा. चंद्रसिंग राजपूत (Professor Chandrajit Rajput) यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरूवर हल्ला चढवत त्यास ठार मारले होते. यामुळे शेतकर्‍यांसह शेतमजुरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. दिवसाच बिबट्याचा वावर शेतशिवारात सुरू असल्याने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वडगाव परिसरातील शेतकर्‍यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांची भेट घेत केली होती.

बिबट्याचा उपद्रव लक्षात घेत पिंजरा लावण्याचे आदेश कृषिमंत्र्यांनी वनअधिकार्‍यांना दिल्याने योगेश भावसार यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. भक्ष्याच्या शोधार्थ फिरत असलेला बिबट्या या पिंजर्‍यात अलगद अडकल्याचे सकाळी निदर्शनास आले. पिंजर्‍यात जेरबंद बिबट्यास पाहण्यासाठी परिसरातील शेतकर्‍यांनी एकच गर्दी केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com