कोठुरे शिवारात बिबट्या जेरबंद

कोठुरे शिवारात बिबट्या जेरबंद

कोठुरे | वार्ताहर

गेल्या काही दिवसांपासून कोठुरे शिवारात (Kothure Shivar) बिबट्याने (Leopard) धुमाकूळ घातला होता. बिबट्याने परिसरातील वासरे, अनेक कुत्रे फस्त केले होते. बिबट्यांचे सतत दर्शन होत असल्याने शेतात राहणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घरून वावरावे लागत होते...

नागरिकांनी वनविभागाला (Forest Department) पिंजरा (Cage) लावण्याची मागणी केली होती. वनविभागाने येथील विश्वास शामसुंदर बर्वे (Vishwas Barve) यांच्या गट नं ४१८ शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद केले.

त्याचवेळी परिसरात आणखी ४ ते ५ बिबटे असल्याचा अंदाज येथील शेतकऱ्यांनी वर्तवला आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

या परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. परिणामी, अनेकदा बिबटे मानवी वस्तीकडे येत असल्याने जीव मुठीत धरून शेतकरी काम करतात. त्यामुळे परिसरात येणाऱ्या बिबट्यांना पकडावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com