सातपूर | प्रतिनिधी

आज सकाळी दुडगाव शिवारात बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. गेल्या आठ दिवसांपासून या बिबट्याने वासाळी, दुडगाव भागात धुमाकूळ घातला होता. एक बैलही त्याने फस्त केल्याची घटना घडली होती...

यानंतर येथील रंगनाथ बेजेकर यांच्या मळ्यात पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजर्यातील भक्ष्याच्या आशेने बिबट्या मध्यरात्री पिंजर्यात अडकला.

बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे पाहताच नागरिकांनी वनविभागाला कळवले. वनविभागाचे अधिक्षक विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे अधिकारी देशपांडे, सचिन अहिरे यांनी बिबट्याला ताब्यात घेऊन त्याची नर्सरीत रवानगी केली.