शिवडेत बिबट्या जेरबंद

शिवडेत बिबट्या जेरबंद

सिन्नर | sinnar

गेल्या काही दिवसापासून शिवडे वन विभागाच्या हद्दीलगत बिबट्याची दहशत कायम होती.

येथील भैरवनाथ मळा परिसरातील राजेंद्र शिंदे यांच्या गाईवर गेल्या काही दिवसापूर्वी बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. तसेच कोंबड्या कुत्रा शेळ्या मेंढ्या यांच्यावर वारंवार बिबट्याचे हल्ले होत होते.

गेल्या काही दिवसात ब-याच वेळा पिंजरा लावला गेला होता. परंतु बिबट्या हाती येत नव्हता. काल रात्री अकराच्या सुमारास बिबट्या भक्ष्याच्या शोधात पिंजऱ्यात अडकला. आणि सकाळी पाहताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

सदरच्या कारवाईत वन विभागाचे वनपालश्री आगळे वनरक्षक सुचेता राठोड बाबुराव सदगीर उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com