शिंदे शिवारात बिबट्या जेरबंद
देवळाली कॅम्प | वार्ताहर | Devali Camp
येथील नाशिक सहकारी साखर कारखाना रोडवर गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्यांची (Leopards) दहशत माजली आहे. या भागांमधील गायखे, सरोदे मळ्यासह इतर परिसरात बिबट्यांचा वावर वाढत असल्याने महिनाभरापूर्वी वनविभागाने (Forest Department) पिंजरा लावला होता. त्यावेळी पळसे येथील गायखे मळ्यात कारखाना रोडवर बिबट्या जेरबंद करण्यात आला होता.
पंरतु, दुसऱ्या एका बिबट्याने शिंदे पळसे (Shinde Palse) परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली होती. या बिबट्याने परिसरातील वासरे, ससे, कुत्रे, कोंबड्या, मेंढरं फस्त केली होती. त्यामुळे येथील नागरिक दहशतीखाली वावरत होते. त्यानंतर आता या बिबट्याला जेरबंद (caught) करण्यात वनविभागाला यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रात्रीच्यावेळी शेतात (Farm) पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) बिबट्या दिसल्याने त्यांनी तातडीने शिंदे गावचे पोलीस पाटील रवींद्र जाधव यांना कळविले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन सदर भागातील शेतकरी दादा जाधव यांच्या गट नंबर 14 / 42 मध्ये पिंजरा (Cage) लावला. त्यानंतर रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
दरम्यान, यानंतर काही शेतकऱ्यांनी तातडीने पिंजऱ्याच्या ठिकाणी धाव घेऊन सदर माहिती पोलीस पाटील व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. यानंतर तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला वनखात्याच्या वाहनातून नाशिक (Nashik) येथे आणण्यात आले.