
वावी | वार्ताहर | Vavi
येथील फुलेनगर परिसरात (Phulenagar Area) असणाऱ्या बिबट्याला (Leopard) जेरबंद (Caught) करण्यात वनविभागाला यश आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, या परिसरातील शेतकऱ्यांना (Farmers) वीजपुरवठा कायम नसल्याने रात्रीच्या वेळेस पिकांना पाणी भरावे लागत आहे. मात्र, बिबट्याने परिसरात धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून पिकांना जीवदान देण्यासाठी कसरत करावी लागत होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तक्रार केली होती.
यानंतर गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून फुलेनगर येथील परिसरात दब धरून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी अजित पठाडे यांच्या गट क्रमांक ३७८ क्षेत्रात पिंजरा (Cage) लावण्यात आला होता. त्यानंतर काल रात्री १२:३० वाजेच्या सुमारास बिबट्याला पकडण्यास वनविभागाला (Forest Department) यश आले आहे. तसेच बिबट्याच्या या दहशतीमुळे शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.
दरम्यान, या बिबट्याला पकडण्यात यश आले असले तरी आणखी दोन बिबटे परिसरात संचार करत असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे वनविभागाने अजून एक पिंजरा लावून उरलेल्या दोन बिबट्यांना तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच पुढील कारवाई वनविभागाचे वनपाल अनिल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक चंद्रमणी तांबे,वनमजूर नारायण वैद्य ,जगन जाधव, सखाराम मधे, संतोष मेंगाळ यांच्या विशेष प्रयत्नात केली जात आहे.