लखमापूर शिवारात बिबट्या जेरबंद

लखमापूर शिवारात बिबट्या जेरबंद

दिंडोरी | Dindori

लखमापूर (Lakhmapur) येथील हनुमानवाडी शिवारात (Hanumanwadi Shivar) गेल्या कित्येक दिवसांपासून धुमाकुळ घालणारा बिबट्या (Leopard) अखेर जेरबंद करण्यात आला आहे. धीरज काळे व निवृत्ती देशमुख यांच्या शेताच्या बांधावर हा बिबट्या जेरबंद करण्यात आला...

याबाबत अधिक माहिती अशी की, हनुमानवाडी परिसरातील वस्तीवर राहणाऱ्या लोकांना अगदी जीव मुठीत धरून शेतीची कामे करावी लागत होती. याआधी देखील या परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या.

तसेच वनविभागाला जनतेच्या रोषाला देखील मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागत होते. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेऊन होते. यानंतर वनविभागाने पिंजरा (Cage) लावला असता बिबट्याला जेरबंद (Imprisoned) करण्यात यश आले. याठिकाणी तीन बिबटे असून त्यापैकी एक जेरबंद झाला आहे. तर दोन बिबट्यांसाठी परत पिंजरे लावण्यात आले आहेत.

दरम्यान, यावेळी वनविभागाच्या अधिकारी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली रामचंद्र तुंगार, वनपाल परिमंडळ अधिकारी, वनरक्षक अण्णा टेकनर, हेमराज महाले, परसराम भोये, रेश्मा पवार, विठ्ठल चौधरी, शांताराम शिरसाठ, बाळू भगरे, आदी वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com