जळगाव शिवारात बिबट्याची मादी जेरबंद

जळगाव शिवारात बिबट्याची मादी जेरबंद

निफाड | Niphad

गेल्या काही दिवसांपासून जळगाव शिवारात (Jalgaon Shiwar) धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याच्या मादीस जेरबंद (Leopard Caught) करण्यास वनविभागाला (Forest Department) यश आले असून अद्यापही याच शिवारात आणखी एक बिबट्या असल्याने वनविभागाने पुन्हा त्याच ठिकाणी पिंजरा (Leopard Cages) लावला आहे.

जळगाव शिवारात ऊसाचे क्षेत्र (Sugarcane Farm) मोठे असल्याने या परिसरात बिबट्यांचे वास्तव्य नित्याचे झाले आहे. बुधवार दि.७ जुलै रोजी सुभाष कराड (Subhash Karad) यांना त्यांचे गट नं.111 मधील ऊसाचे शेतात दोन बिबटे दिसून आले. परिणामी त्यांनी त्याबाबत वनविभागाला माहिती दिली.

साहजिकच वनविभागाच्या अधिकार्‍यांनी कराड यांचे ऊसाचे शेतात गट नं. 111 मध्ये पिंजरा लावून बिबट्याला खाद्य म्हणून पिंजर्‍यात कोंबडी ठेवली होती. गुरुवारी पहाटेच्या सुमारास कोंबडी पकडण्याच्या नादात बिबट्या पिंजर्‍यात शिरला अन् अलगद अडकला.

बिबट्या पिंजर्‍यात अडकल्याचे समजताच कराड यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. परिणामी वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख (Forest Range Officer Bashir Sheikh), वनरक्षक सुनील महाले, वनसैवक भैय्या शेख व वनमजूर यांनी घटनास्थळी धाव घेत जेरबंद झालेल्या बिबट्यास पिंजर्‍यासह निफाडच्या रोपवाटिकेत आणले. पकडलेल्या बिबट्याची मादी दीड ते दोन वर्षाची असून तीला पुन्हा जंगलात सोडण्यात येणार आहे.

दरम्यान याच परिसरात अद्यापही एका बिबट्याचे वास्तव्य असल्याने वनविभागाने पुन्हा त्याच ठिकाणी पिंजरा लावला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com