बिबट्या
बिबट्या
नाशिक

देवळालीत पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद

नागरिकांमध्ये समाधान

Gokul Pawar

Gokul Pawar

देवळाली कॅम्प | Deolali Camp

येथील धोंडी रोड मार्गावरील लष्करी एमटी बॅटरीच्या आर्मी कूटर जवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात पहाटे नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला.

गेल्या वर्षं भरापासून या भागात बिबट्याचा ववावर असल्याने ठीकठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. (दि.२९) रोजी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्याच्या गुरगुरण्याच्या आवाजाने गस्त घालणाऱ्या लष्करी जवानांना ही बाब लक्षात आली. त्यांनी सदर बाब वरिष्ठांना सांगितली. त्यांनी तात्काळ देवळाली कॅम्प पोलिसांना माहिती दिली असता पोलीसानी वनविभागास घटनेची माहिती दिली.

त्यानुसार वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपरिमंडल अधिकारी मधुकर गोसावी, वनरक्षक विजय पाटील अशोक खांझोडे अधीच्या पथकाने घटनास्थळी येऊन बिबट्या सह पिंजरा ताब्यात घेतला. त्याची रवानगी गंगापूर रोड वरील रोपवाटिका उद्यान येथे करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com