चाडेगाव शिवारात बिबट्या जेरबंद

चाडेगाव शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथून जवळच असलेल्या चाडेगाव शिवारात (Chadegaon Shivar) लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये (cage) दहा वर्षाचा बिबट्या (Leopard) जेरबंद झाला असून आत्तापर्यंत पकडण्यात आलेल्या बिबट्यामध्ये हा सर्वात मोठा बिबट्या असल्याचे बोलले जात आहे...

गेल्या काही दिवसापासून येथून जवळच असलेल्या सामनगाव (Samangaon) चाडेगाव (Chadegaon) कोटमगाव (Kotamgaon) आधी परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचे दर्शन होते. त्याचप्रमाणे चाडेगाव शिवारात काही दिवसापासून बिबट्या वावरत होता.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उसाची शेती असल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळत होती. परिणामी बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत असल्याने येथील नागरिक भयभीत झाले होते. यानंतर सदर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी वनविभागाकडे (Forest Department) केली होती.

तसेच या भागात परिसरात राहणारे गणेश मानकर यांच्या मळ्याशेजारी वनविभागाचे जंगल (Forest) असल्याने या परिसरात बिबट्याचा कायम वावर असतो. यातच शेतीसाठी काम करणाऱ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी वनविभागाने या भागात पिंजरा लावल्यानंतर आज बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

दरम्यान, बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती नागरिकांना समजताच त्याला बघण्यासाठी मोठी गर्दी (crowd) केली होती. तसेच हा बिबट्या आतापर्यंतचा सर्वात मोठा बिबट्या असल्याचे वनविभागाचे म्हणणे असून सदर बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com