चाडेगाव शिवारात बिबट्या जेरबंद

चाडेगाव शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिकरोड । Nashik

येथून जवळच असलेल्या चाडेगाव शिवारात भाऊसाहेब मानकर यांच्या मळ्यात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून त्याला वनविभागा च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्या बिबट्याची रवानगी गंगापूर येथील रोपवाटिका येथे करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यापासून नाशिक रोड च्या पूर्व भागात असलेल्या मळे विभागात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर सुरू आहे. त्यातच करोनाचा कहर व लोक डाउन त्यामुळे रस्ते व परिसर निर्मनुष्य झाला आहे.

अशा परिस्थितीत बिबटे मोठ्या प्रमाणात दिवस व रात्रीच्या वेळी वावरत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे. मानकर यांच्या मळ्यात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर सुरू होता. परिणामी या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती या मागणी नुसार या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता.

अखेर या पिंजऱ्यात सदरचा बिबट्या जेरबंद झाला असून ही माहिती व वनविभागाचे अधिकारी विवेक भदाणे अनिल अहिरराव व त्यांचे सहकारी यांना समजता च त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला रेस्क्यू वाहनाने घेऊन गंगापूर येथील रोपवाटिका येथे ठेवण्यात आले. या भागात बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com