सिन्नर : शहा येथे मादी बिबट्या जेरबंद

आणखी पिंजरा लावण्याची मागणी
सिन्नर : शहा येथे मादी बिबट्या जेरबंद

शहा | Shaha

शहा परिसरात दहशत पसरवणारी बिबट्या मादी अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अलगद अडकली.

मात्र त्यासोबत असलेले नर बिबट्या तसेच दोन पिल्ले स्थानिक रहिवाशांच्या पाहण्यात आल्याने परीसरात बिबट्याची दहशत कायम आहे.

शहा- कोळगाव रस्त्यादरम्यान असलेल्या सोनवणे मळा लगत सोपान राहणे यांचे उसाचे क्षेत्र आहे. या ठिकाणी वन विभागाने चार-पाच दिवसापूर्वी पिंजरा लावला होता.

शुक्रवार (दि. २१)रोजी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सावज म्हणुन कोंबड्या सोडण्यात आल्या होत्या. सावजाच्या शोधात बिबट्या मादी रात्री सात वाजेच्या सुमारास पिंजऱ्यात अडकली. ही गोष्ट ग्रामस्थांच्या लक्षात निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदर माहिती वन विभागाला दिली.

रात्री अकरा वाजेच्या दरम्यान वन विभागाने मादी बिबट्यास ताब्यात घेऊन त्याची वन उद्यानात रवानगी केली. मात्र बिबट्या मादी बरोबर असलेले नर बिबट्या तसेच दोन बछडे ग्रामस्थांनी पाहील्याने दहशत कायम आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com