पिंपळगाव बहुला येथे बिबट्याचा बछडा जेरबंद

पिंपळगाव बहुला येथे बिबट्याचा बछडा जेरबंद

सातपूर | Satpur

पिंपळगाव बहुला शिवारात गोकुळ नागरे यांच्या मळ्यामध्ये बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात अडकला आहे.

या बछड्या सोबत त्याची आई व आणखी एक बछडा असण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. त्रंबक विद्यामंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर दिसून आलेला आहे.

पिंपळगाव बहुला वासाळी या परिसरातील मळे परिसरात मोर, कुत्रे, बकऱ्या याची नेहमीच शिकार केली जाते. त्र्यंबक विद्या मंदिर येथे घनदाट वनराई असल्याने व लगतच पाण्याचा साठा असल्याने या ठिकाणी त्यांचे वास्तव्य जास्त असते.

अनेक वेळा शेतकऱ्यांनी एका मादी दोन बछडे पाहिल्याचे बोलले जाते काल शिवसेनेचे नेते गोकुळ नागरे यांच्या मळ्यात पिंजरा लावलेला असताना यात बिबट्याचा बछडा अडकला आहे.

या बछड्याच्या शोधात मादी हिंस्त्र होण्याची शक्यता असल्याने परिसरातील नागरिकांची भीतीने गाळण उडाली आहे. या परिसरात तातडीने पिंजरा लावून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com