लॅमरोड परिसरात बिबटयाचे दर्शन

लॅमरोड परिसरात बिबटयाचे दर्शन

देवळाली कॅम्प | Deolali Camp

येथील लॅमरोड परिसरातील नाका न.६ जवळील कासाब्लांका सोसायटीत दोन दिवसापासून बीबट्याचा वावर वाढला असून पाळीव कुत्र्याना भक्ष केले जात असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

नाशिक शहरात मागील आठवड्यात नागरी वस्थीत बिबट्या जेरबंद करण्यात आल्या नंतर नाशिकरोड-देवळाली कॅम्प च्या सीमेवर लॅमरोड भागातील नागरी वस्थीत असलेल्या सोसाईटी परिसरात बिबट्याने रात्रीचा खेळ मांडला आहे. कासाब्लांका सोसायटीत दोन दिवसापासून बिबट्याचे दर्शन होत आहे.

याबाबत सोसायटी वॉचमन यांनी रहिवाशांना जागृत केले आहे. येथील पाळीव प्राणी भक्ष केले जात आहे. तसेच सोसायटीच्या सीसीटीव्ही मध्ये देखील बिबट्याच्या हालचाली दिसत असून सोसायटीतील नागरिक यांनी रात्री दीड वाजेला टेरेस वरून बिबट्याची छबी कॅद केली आहे.

याबाबत येथील नागरिक रमेश गायकर यांनी वनाधिकारी विजय पाटील यांना माहिती दिली असता ताबडतोब येथे पिंजरा लावण्यात येणार असल्याचे सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com