ब्राह्मणवाडे परिसरात बिबट्या जेरबंद

ब्राह्मणवाडे परिसरात बिबट्या जेरबंद

करंजी खुर्द | Karanji Khurd

निफाड तालुक्यातील ब्राह्मणवाडे झुगे येथे गेल्या काही दिवसा पासून परिसरात बिबट्याच्या मुक्त संचाराने ग्रामस्थ भयभीत झाले होते.

या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार होता. अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी ही भयभीत होते. अनेकांच्या कोंबड्या, बकऱ्या यांचा फडशा पाडला होता. तसेच रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी जाण्यासाठी घाबरत होते.

परिणामी परिसरात वनविभागाच्या माध्यमातून पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजऱ्यात आज बिबट्या जेरबंद झाला. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com