नाशिकरोड । Nashik

चांदगिरी शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात शनिवारी पहाटेच्या दरम्यान बिबट्या जेरबंद झाला. चांदगिरी शिवारात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेतात आहे.

तसेच या परिसरात वनविभागाची जमीन आहे. त्यामुळे बिबट्यांना लपून राहण्यासाठी जागा आहे. या परिसरात बिबट्याचा कायम वावर असतो. काही दिवसांपूर्वी येथील नागरिकांना बिबट्याने दर्शन दिले होते.

नागरिकांनाच्या मागणी नुसार के.के. फार्म परिसरात पिंजरा लावण्यात होता. शनिवार पहाटे दरम्यान या पिंजर्यात बिबट्या जेरबंद झाला.

सदर महिती पोलिस पाटील लखन कटाळे यांनी वनविभागाला दिली व वनविभागाचे विजयसिंग पाटील व सेवकांनी बिबट्याला ताब्यात घेतले.