बिबट्या
बिबट्या |digi
नाशिक

पळसे शिवारात बिबट्याचा बछडा जेरबंद

दारणा नदीकाठचा परिसर...

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

पळसे गावात लावलेल्या एका पिंजऱ्यात सोमवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास बिबट्याचा बछडा जेरबंद झाला. संतोष गायधनी यांच्या शेतात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात भक्ष्याच्या शोधात असलेला हा बछडा अडकला.

दरम्यान दारणा नदीकाठ लगतचा परिसरात अद्यापही बिबट्याचा दहशतीत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर उस शेती असल्याने दहा बारा बिबटे असण्याची शक्यता वनविभागाकडून काही दिवसांपुर्वी वर्तविण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर परिसरात अनेक थिअक्नि वनविभागाकडून पिंजरे लावण्यात आलेले आहेत. यामध्ये पळसे शिवारात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात हा बछडा जेरबंद झाला.

सकाळच्या सुमारास स्थानिक शेतकऱ्यांना बिबट्याच्या डरकाळ्या व गुरगुरण्याचा आवाज आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे वनपाल, कमर्चारी यांनी घटनास्थळ गाठत बिबट्याचा पिंजरा वन्यप्राणी रेस्क्यू व्हॅनमधून सुरक्षित ठिकाणी हलविला.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com