इगतपुरीत बिबट्याचे बछडे जेरबंद

इगतपुरीत बिबट्याचे बछडे जेरबंद

नाशिक | प्रतिनिधी Nashik

इगतपुरीत बिबट्याचे बछडे जेरबंद झाले आहे. इगतपुरीच्या वन विभागाने (Igatpuri Forest dept) गेल्या दोन दिवसांपासून याठिकाणी पिंजरा लावला होता. आज अखेर बिबट्या जेरबंद झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला....(leopard calf caught in the cage in igatpuri)

येथील सह्याद्रीनगर (Sahyadrinagar igatpuri) भागात २ दिवसांपूर्वी एक व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. यानंतर येथील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली होते.

आज पहाटे इगतपुरी (Igatpuri) येथील शिवाजी नगर (Shivajinagar) परिसरात फुल तोडायला गेलेल्या योगेश खोलमकर या युवकास पिंजऱ्यात हालचाल जाणवल्याने त्याने पिंजऱ्यात पाहिले असता त्यात बिबट्या होता त्याने लगेच वन विभागाला कळवले.

या परीसरात अजूनही एक बिबट्या असल्याची शक्यता येथील नागरिकांनी वनविभागाकडे वर्तविली आहे.

इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस (Ketan Biraris) यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव आदींनी जेरबंद केलेल्या बिबट्याबाबत पुढील सोपस्कार केले. नागरिक भयमुक्त होण्यासाठी वन विभाग कटिबद्ध असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com