बिबट्या
बिबट्या
नाशिक

देवळाली कॅम्प : बिबट मादी, बछडे ‘सीसीटीव्ही’त कैद

नागरिक भयभीत

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिकरोड : Nashikroad

दारणाकाठी बिबट्याने धुमाकूळ घातला असताना देवळाली कॅम्प शहराच्या मध्यवर्ती भागात नागरी वस्तीत बिबट्याची मादी व बछड्यांचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेरात बंदिस्त झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

दारणाकाठी लोहशिंगवे, लहवित, भगूर, वंजारवाडी, राहुरी, दोनवडे, शेवगेदारणा, नानेगाव, संसरी, पळसे, बेलदगाव या भागात गेल्या चार महिन्यांत बिबटे सक्रिय झाले असून चार मानवबळी व जनावरांचा फडशा पाडला आहे.

याबाबत वनविभागाने राज्यातील विविध ठिकाणची यंत्रणा वापरून बिबटे जेरबंद करण्याची मोहीम सुरू केलेली आहे. देवळाली कॅम्पच्या विजयनगर भागात मागील महिन्यात दर्शन देण्यार्‍या बिबट्याच्या मादीने आता रेस्ट कॅम्प रोडवरील लष्करी वर्कशॉप परिसरात रात्रीच्या वेळेस बछड्यासह मुक्त संचार करीत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नागरी विभागसह लष्करी आस्थापनादेखील यामुळे चिंतेत पडली आहे. बनात चाळलगतचा नाला, लष्करी विभागाचे सुमारे ०१ हजार एकर वरील मोकळे जंगल व दाट झाडी असा परिसर बिबट्यासाठी सोयीचा झाला आहे. त्यामुळे या भागात त्यांचा वावर नेहेमीच दिसून येतो. सध्या मादी व बछडे यांचा वावर धोकादायक बनू पाहत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com