शेवगेडांग शिवारात बिबटयाचा वासरावर हल्ला

परिसरात बिबटयाचा मुक्त वावर
शेवगेडांग शिवारात बिबटयाचा वासरावर हल्ला
संग्रहित छायाचित्र

आहुर्ली । Ahurli

शेवगेडांग शिवारात (Shevgedang) आज मध्यरात्री बिबटयाने मळयातील घराजवळ असलेल्या गोठ्यातील वासरावर हल्ला (Attack on the calf) केला आहे. सुदैवाने वासराच्या हंबरण्याने जागी झालेल्या शेतकऱ्यांनीं तातडीने गोठयाकडे धाव घेत वासराचा जीव वाचवला. बिबटयाच्या या मुक्तसंचारामुळे (Leopard Sightning) मात्र शेवगेडांग परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे.

शेवगेडांग ता.इगतपुरी (Igatpuri) येथील मोहन बंडू पोरजे यांची मळयात वस्ती असुन त्यांच्या मालकीच्या वासरावर बिबटयाने हल्ला केल्याची माहिती शेवगेडांगचे उपसरपंच विष्णू पोरजे (Upsarpanch Vishnu Porje) यांनी दिली आहे. या हल्ल्यात वासरु जखमी (Carlf Injured) झाले असुन या घटनेनंतर परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.

दरम्यान अलिकडच्या काळात इगतपुरी तालुक्यात बिबटयाने हैदोस घातल्याचे असंख्य प्रकार घडलेले आहेत. पिंपळगाव मोर, टाकेद परिसरात चक्क दोन तीन लहान बालकांचे बळीही गेलेले आहेत. या हल्ल्यानंतर या ताज्या घटनांना उजाळा मिळाला असुन, बिबटयाच्या या मुक्त संचाराची तातडीने दखल घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनीं केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com