बिबट्याचा युवकावर हल्ला

बिबट्याचा युवकावर हल्ला

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

येथील लामरोड (Lam Road) भागातील जमाल सॅनेटोरियम (Jamal Sanatorium) मध्ये बिबट्याने (Leopards) युवकावर हल्ला (Attack) केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे....

देवळाली कॅम्पसह (Deolali Camp) दारणा काठच्या क्षेत्रात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचे वास्तव्य आहे. परिसरात ऊसतोड होत असल्याने बिबटे लपण्यासाठी इकडे तिकडे फिरत असल्याचे दिसून आले आहे.

सायंकाळी ५ वाजता बादल उन्हवणे (Badal Unhavane) हे रिक्षा घेऊन जमाल सॅनेटोरियम येथे जात असताना बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने बिबट्याचा हल्ला चुकला. मात्र रिक्षाचे हूड बिबट्याने फाडले.

काही क्षणातच असले वाटले की आता काही खरे नाही, अशी प्रतिक्रिया बादल उन्हवणे यांनी दिली. या भागात तातडीने पिंजरा लाववा, अशी मागणी उन्हवणे परिवाराने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com