बिबट्याने पाडला श्वानाचा फडशा; व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद

नाशिक । Nashik

घराच्या अंगणात बसलेल्या एका पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला (Leopard attack on dog) केल्याची घटना नाशिक (Nashik) येथील मुंगसरा (Mungsare) गावात घडली आहे. बिबट्याने पाळीव कुत्र्यावर (dog) हल्ला केल्याची ही घटना घराबाहेरील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे...

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या व्हिडीओमध्ये मुंगसरा ((Mungsare) येथील शेतकरी (Farmer) किशोर उगले (Kishor Ugale) यांच्या घराच्या अंगणात पाळीव कुत्रा रात्रीच्या सुमारास कठड्यावर बसल्याचे दिसत आहे.

यानंतर काही सेकंदात तिथे बिबट्या (Leopard) येतो. बिबट्या आल्याचे पाहताच कुत्रा त्याच्यावर भुंकत पळण्याचा प्रयत्न करतो. यावेळी बिबट्या काही वेळासाठी मागे जातो आणि कुत्रा अंगणात येताच त्याच्यावर हल्ला करतो. काही वेळाने बिबट्या कुत्र्याची शिकार करुन त्याला जबड्यात पकडून पळून जाताना दिसत आहे.

दरम्यान, गावात (village) शिरुन बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याच्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या (Forest Department) कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गावात आणि आसपासच्या परिसरात शोध मोहीम (Search operation) सुरू केली आहे. तर या बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com