बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

 बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

ओझे | वार्ताहर | Oze

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluk) सोनजांब (Sonjamb) येथील शेतकरी बाकेराव हरी जाधव (Farmer Bakerao Hari Jadhav) (६०) हे आपल्या शेतातील विहिरीकडे (well) घरातील पाणी भरण्याकरिता मोटर सुरू करण्यासाठी जात असतांना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, या हल्ल्यात जाधव यांच्या मानेला, गळ्याला आणि पायाला जखम झाली असून त्यांनी जोरदार प्रतिकार व आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी त्वरित धाव घेत त्यांची बिबट्याच्या (Leopard)तावडीतून सुटका केली. यानंतर घरच्यांनी जाधव यांना उपचारासाठी जवळच असणाऱ्या खेडगाव (Khedgaon) येथे आणले असता जखम झालेल्या ठिकाणी टाके पडले आहेत.

दरम्यान, सोनजांब, जवळके वणी, गोंडेगाव या परिसरात बिबट्याचा नेहमीच वावर असल्याचे दिसून आले आहे. तसेच अनेक शेतक-यांच्या शेळ्या देखील बिबट्यांनी फस्त केल्या आहेत. त्यामुळे वनविभागाने (Forest Department) तात्काळ याठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा (Cage) लावावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com